You are currently viewing स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूकीवर कारवाई करावी – मनसेची मागणी

स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूकीवर कारवाई करावी – मनसेची मागणी

स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूकीवर कारवाई करावी – मनसेची मागणी

इन्सुली उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयावर मनसेची धडक

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात गोवा बनावटीच्या दारूची खुलेआम विक्री होत आहे. मात्र उत्पादन शुल्क खाते केवळ परराज्यातील दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. वर्ष अखेरीस गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूक कारवाई करून बंद करावी अशी मागणी मनसेच्या वतीने उत्पादन शुल्क खात्याला करण्यात आली.

मनसेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, विष्णू वसकर, चिन्मय नाडकर्णी, सुनील आशवेकर यांनी उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्यावर आज धडक देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहनांना काळ्या काचा लावून त्यातून दारू वाहतूक होत असल्याचा आरोप करत याला उत्पादन शुल्क खात्याचे अभय असल्याचा आरोप यावेळी ऍड. केसरकर यांनी केला.
गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यास ९९ टक्के कारवाई या परराज्यातील गाड्यांवर करण्यात आल्या आहेत. स्थानिकांना मात्र अर्थपूर्ण व्यवहार करून अभय देण्यात येते. आता वर्ष अखेर असल्याने गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूचा महापूर येणार आहे. या गाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्पादन शुल्क खात्याचे उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी यासंदर्भात आपले म्हणणे वरिष्ठाना कळवून कारवाई करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 12 =