You are currently viewing खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी घेतली खा. शरद पवार यांची सदिच्छा भेट

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी घेतली खा. शरद पवार यांची सदिच्छा भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार हे वेंगुर्ले दौऱ्यावर आले असताना खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. शरद पवार यांनी खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा करत मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,व्हिक्टर डांटस आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा