You are currently viewing अचिर्णे येथे कृषी संजीवन सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

अचिर्णे येथे कृषी संजीवन सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी

आज दि.२८ जून २०२२ रोजी आचिर्णे येथे कृषी विभाग तालुका वैभववाडी व कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, केंद्र आचिर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवन सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभववाडी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे होते त्यांनी अचिर्णे ग्रामस्थांना भात लागवड आधुनिक तंत्रज्ञान,विविध सरकारी योजना आदिंची महिती दिली व शेतकऱ्यांशी मनसोक्त संवाद साधला व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आचिर्णे गावचे कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे यानी केले. या कार्यक्रमासाठी आत्मा कमिटी सदस्य उत्तम सुतार.माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कडू.प्रगतशील शेतकरी सुरेंद्र रावराणे. कृषी सहाय्यक- बालाजी वाघमोडे, अमोल पाटेकर, सचिन देवरे, विश्वजित पाटील, दीपक मासेकर. कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, महिला शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा