You are currently viewing संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या पाठीशी- आ. वैभव नाईक

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या पाठीशी- आ. वैभव नाईक

*…तर जनता राणेंना काय म्हणून आशीर्वाद देणार..!*

कोविड महामारी असो, कोकणात झालेली चक्रीवादळे असो, मराठा आरक्षण असो या सर्व प्रश्नांवर अगोदर सत्ताधारी भाजप पक्षाचे खासदार असलेल्या व आता केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी कोकणच्या जनतेसाठी काय दिले हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत जनता राणेंना काय म्हणून आशीर्वाद देणार याचे राणेंनी आत्मपरीक्षण करावे. राणे कोकणात फिरल्याने शिवसेनेचे प्राबल्य कमी न होता ते वाढतच जाणार आहे. विरोधकांनी खासदार विनायक राऊत यांच्या बाबतीत कितीही गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या पाठीशी आहे. असे परखड मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.

मालवण तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत दैवज्ञ भवन मालवण येथे आज पार पडली.
यावेळी आ. वैभव नाईक पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचे काम खा. विनायक राऊत यांनी केले आहे. शिवसेना पक्ष जिल्ह्यात वाढत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांच्या धडाक्यामुळे अनेक पक्षाचे लोक शिवसेनेत दाखल होत आहेत. याचे सर्व श्रेय खा. विनायक राऊत यांना आहे. विनायक राऊत यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु विरोधकांच्या भूलथापांचा विचार शिवसैनिक करत नाहीत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या पाठीशी आहे. यापुढच्या सर्व निवडणुकीत खा. राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व सत्तास्थाने ताब्यात घेणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या भूलथापांपासून दूर राहून शिवसेना संघटना अधिक बळकट होण्यासाठी काम करावे. असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
या बैठकीला जि.प. गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, नितीन वाळके, मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बंडू चव्हाण, भाऊ परब, समीर लब्दे, राजेश गावकर, पंकज वर्दम, यशवंत गावकर, किरण वाळके, चंद्रकांत गोलतकर, राजू परब, शीला गिरकर, सेजल परब, पूनम चव्हाण, अंजना सामंत, अनुष्का गावकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, राजू नार्वेकर, बाबा सावंत, दीपा शिंदे, विजय पालव, यांसह मालवण मधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा