You are currently viewing देवगडात प्रथमच आ. नितेश राणेंच्या माध्यमातून मिसळ महोत्सवाचे आयोजन

देवगडात प्रथमच आ. नितेश राणेंच्या माध्यमातून मिसळ महोत्सवाचे आयोजन

एकाच छताखाली चाखता येणार महाराष्ट्रातील १५ मिसळींची चव

देवगड :

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून देवगडात प्रथमच मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आपल्याला महोत्सवात स्वाद मिसळ, कोल्हापुरी तांबडी मिसळ, तर्री, रस्सा कोल्हापुरी मिसळ, राजेशाही मिसळ, नगर पारनेर मिसळ, नाशिक मिसळ, विठू माउली मिसळ, नाशिक पुणे मिसळ, मातोश्री मिसळ, जुन्नर पुणेरी मिसळ अशा महाराष्ट्रातील तब्बल १५ मिसळींची चव एकाच छताखाली चाखता येणार आहे. या पूर्वी वैभववाडीमध्ये अशा मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या मिसळ महात्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील तब्बल १५ मिसळींची चव एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे मिसळ प्रेमी आणि खव्वयांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा