You are currently viewing शासनाकडून अपेक्षा ठेऊ नका, कोविड विरोधी लढ्यात सक्रिय सहभाग घ्या!

शासनाकडून अपेक्षा ठेऊ नका, कोविड विरोधी लढ्यात सक्रिय सहभाग घ्या!

भाजप प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

हडी ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षाचे लोकार्पण

मालवण
सध्याच्या कोविड काळात या शासनाकडून जिल्ह्यासाठी कोणत्याही अपेक्षा ठेऊ नका. आपल्या जिल्ह्यातील जनतेचा जीव आपल्यालाच वाचवायचा असून भाजप कार्यकर्त्यानी या लढ्यात सक्रियपणे सहभागी व्हावे. या कार्यकर्त्यांना पक्षाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी हडी (ता. मालवण) येथे बोलताना केले.

ग्रामपंचायत हडी कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांसाठी शासन निर्णयाप्रमाणे ग्रामविलगीकरण कक्ष कै.के.जी. मांजरेकर शाळा हडी नं. १ येथे स्थापन करण्यात आला आहे. या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन माजी खा. निलेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. या विलगीकरण कक्षामध्ये २५ रुग्णांसाठी नेबिलायझर व्यवस्था, मोबाईल चार्जिंग व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाणी व्यवस्था, २४ तास पाण्याची व्यवस्था, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा