You are currently viewing कॉ. विजयाराणी पाटील यांची सीटू च्या राज्य जनरल कौन्सिलवर फेरनिवड

कॉ. विजयाराणी पाटील यांची सीटू च्या राज्य जनरल कौन्सिलवर फेरनिवड

कणकवली

मुरगूड, कोल्हापूर येथे ६-८ जानेवारी २०२३ ला झालेल्या १६ व्या राज्य अधिवेशनात कॉ. विजयाराणी पाटील यांची सीटू च्या राज्य जनरल कौन्सिलवर फेरनिवड झाली तर प्रा. डॉ. सुभाष जाधव यांची राज्य सचिव पदावर निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी २०१२ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना सीटूच्या झेंड्याखाली संघटीत करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हा व राज्य स्तरावर विविध लढे उभारले. त्यांच्या अनेक आंदोलनातील सहभागाबद्दल प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे नोंद करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. राज्य व केंद्र सरकारने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार दरमहा रु २६०००/- वेतन मिळावे व इतर सर्व अनुषंगिक लाभ मिळावेत यासाठी त्यांनी सीटूच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे काम चालू ठेवले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनीही गेली अनेक दशके सीटूच्या माध्यमातून महाराष्ट्रात आशा गटप्रवर्तक, साखर कामगार, ऊस तोडणी वाहतूक कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, प्राध्यापक, एम. आर. यांना न्याय मिळवून दिला आहे.

तसेच राज्य पदाधिकारी म्हणून डॉ. डी एल कराड (नाशिक) यांची राज्य अध्यक्ष, ॲड. एम. एच. शेख (सोलापूर) यांची महासचिव व कॉ. के. आर. रघू यांची कोषाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा