You are currently viewing चौदा दिवसांत केला ३७०० किमींचा प्रवास

चौदा दिवसांत केला ३७०० किमींचा प्रवास

*चौदा दिवसांत केला ३७०० किमींचा प्रवास*

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारीद्वारे ‘एमआयटी ए़डीटी’चा नशामुक्तीचा संदेश

पुणे

आपल्यात उत्साह ध्यास आणि जगात बदल घडविण्याची दुर्देम्य इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील, रोविंग या क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप भापकर यांनी अशीच कामगिरी करून ते सिद्ध केले आहे. संदीप यांनी विद्यार्थी साईकोंडाला सोबत घेत, आशिया खंडातील सर्वांत लांब मार्ग असणाऱ्या काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलने पूर्ण करताना नशामुक्तिचा संदेश दिला आहे. यासह, त्यांनी हा ३७०० किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर अवघ्या १४ दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.
काश्मिरमधील प्रसिद्ध लाल चौकातून १९ तारखेला सुरु झालेल्या प्रवासात, १० राज्य, १ केंद्र शाशित प्रदेश पार करत व सायकल पंक्चर होणे, काश्मिरमधील सैन्याचे विविध चेकपोस्ट, उन्हामुळे होणारे सनबर्न अशी आव्हाने लिलया पार करत संदीप व साईकोंडा यांनी तिरंग्यासह ‘एमआयटी एडीटी’चा झेंडा कन्याकुमारीत ८ सप्टेंबर रोजी फडकाविला. या सायकल वारीतून तंबाखू, दारू, सिगारेटच्या व्यसनांपेक्षा सायकल चालविण्याचे व्यसन शाररिक तंदरूस्तीसाठी किती चांगले आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.सुरेश भुयार, प्रा.पद्माकर फड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
संदीप भापकर हे विद्यापीठात रोईंग या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षक आहेत. या खेळात हातातील व पायातील ताकदीचा खऱ्याअर्थाने कस लागतो. तिच ताकद वाढविण्यासाठी (इंन्डूरन्स) संदीप यांनी सायकलींगला सुरुवात केली. त्याचा प्रारंभ, जेजरी, सिंहगड, पंढरपूरची वारी व नंतर गोवा अशा स्थानिक ठिकाणांना भेट देत केला. नंतर त्यांनी पुणे ते कन्याकुमारी हे १६०० किमींचे अंतर देखील पार केले. आता वेध लागले होते ते आशियातील सर्वांत लांब मार्ग काश्मिर ते कन्याकुमारीच्या वारीचे!
अखेर योजना ठरली, त्यानुसार स्वातंतत्र्यदिनी आपल्या सायकल बाॅक्समध्ये पॅक करून दोघांनी झेलम एक्सप्रेसने पुणे सोडले. जम्मू गाठल्यानंतर तेथून लाल चौक, श्रीनगर पर्यंतच्या प्रवासात वातावरणाशी जुळवून घेण्यासोबतच सैन्याचे अनेक चेक पोस्ट त्यांनी पार केले. लाल चौकातून प्रवास सुरु करून रोज २०० ते २२० किमी पर्यंत सायकल चालवत, बदलणाऱ्या प्रदेशांसोबतच, बदलणारी मानसे, त्यांची भाषा, खाद्यपदार्थ, राहणीमान, ऐतिहासिक पानीपथ, आग्र्याचा लाल किल्ला अशी ठिकाणे पाहात विक्रमी वेळेत दोघांनीही भारताचे शेवटचे टोक कन्याकुमारी गाठले.

*चौकट*
सायकल हेच आमचं व्यसन
मध्य प्रदेशमधून जात असताना तोंडात तंबाखूचा माल भरलेल्या व्यक्तीने आम्हाला, ‘आधुनिक साधने असताना सायकलच का, व हे सर्व कशासाठी?’ असा प्रश्न विचारला. त्यावर, ‘जसे तुम्हाला तंबाखूचे व्यसन आहे, तसेच सायकल चालवणे हे आमचे व्यसन आहे. फक्त फरक एवढांच की, ते तुमचे आयुर्मान कमी करतंय तर आम्ही आमचे वाढवतोय,’ असे उत्तर दिल्याची आठवण संदीप यांनी सांगितली.

*कोट*
या प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध करणारा होता. ज्यात विविधतेने नटलेल्या भारताचे अद्भुत दर्शन घडले. यातून आम्ही नशामुक्तिचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रवास एमआयटी एडीटी विद्यापीठाने दिलेल्या मानसिक, आर्थिक पाठबळा शिवाय शक्य नव्हता. यानंतर भारताच्या नकाशाच्या बाह्यरेषेचा प्रवास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
– संदीप भापकर, राष्ट्रीय प्रशिक्षक रोईंग.

संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − seven =