You are currently viewing सावंतवाडी रेल्वे स्थानकातून दोन पाकीटमारांना घेतले ताब्यात

सावंतवाडी रेल्वे स्थानकातून दोन पाकीटमारांना घेतले ताब्यात

तुतारी एक्सप्रेसमध्ये युवतीचे मोबाईल व पाकीट चोरी

 सांवतवाडी

तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईवरून सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या मळेवाड येथील एका युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवम कुमार (१९) व शिवा कुमार (१९) दोघे रा. उत्तरप्रदेश, अशी संशयितांची नावे असून त्यांना सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

चोरट्यानी प्रवासादरम्यान युवतीच्या बॅगमधील मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य किमती वस्तू त्यांनी लंपास केल्या होत्या. दरम्यान सावंतवाडी स्थानकात उतरल्यानंतर वडिलांना फोन करण्यासाठी तिने मोबाईल पाहिला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे आपला मोबाईल व इतर साहित्य चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिने रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेले पोलिस दीपक लोंढे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर लोंढे यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन त्या डब्यात तपासणी केली असता ते दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यामुळे त्यांची तपासणी करत असताना चोरीला गेलेल्या मोबाईल व अन्य वस्तू आढळून आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा