You are currently viewing सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन

सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारावासियांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने दसरा मेळावा व स्नेहसंमेलन सोहळा दि. २३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सहकार, उद्योग, कायदा, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय, कामगार, साहित्य, कला व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील किर्तीवंतांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराट्रातून सातारकराना नामांकने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दसरा मेळावा व स्नेहसंमेलन निमित्त मान्यवरांना त्यांची नामांकने दि. १८-१०-२०२३ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात पाठवायची आहेत. सोबत संपूर्ण माहिती, कार्याचा आढावा, गावाचे नाव व तालुका, नामांकन क्षेत्र ¸छायाचित्र पुढील पत्त्यावर किंवा ईमेल द्वारे पाठवावे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई¸ बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई ४०००१२ . दूरध्वनी ९९६७९१५५७७ /९९८७१९९५६५/ ०२२ २३७०१५६० ई मेल : amhisatarkar12@gmail. com

प्रतिक्रिया व्यक्त करा