You are currently viewing पहिल्याच वर्षी सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या बी. एम. एस विभागाचा निकाल १०० टक्के..

पहिल्याच वर्षी सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या बी. एम. एस विभागाचा निकाल १०० टक्के..

रत्नागिरी :

 

चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या बी.एम.एम विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक निवेदिता जैन (९.८५/१०), संस्कृती पाटील (९.८५/१०), द्वितीय क्रमांक चिन्मयी घाग (९.७०/१०), साक्षी ईथापे (९.७०/१०), सेजल सुर्वे (९.७०/१०), तर तृतीय क्रमांक तन्वी साळुंखे (९.५५/१०) यांनी पटकावला आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक सभेमध्ये सावर्डे कॉलेजने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्राचे वाढते महत्व लक्षात घेऊन ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांचा सकारात्मक कल पहायला मिळत आहे.

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात बी.एम.एस. हा मुंबई विद्यापीठ मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरु झाला आहे. या पदवी अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत असून, एम.बी.ए. शिक्षित अनुभवी प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, ऑनलाईन प्रशिक्षण, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग,(नोकरीची हमी)क्रीडा व सांस्कृतिक विभाग ही या महाविद्यालयाची वैशिष्ट्य असून शहरी भागातील सर्व सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्याची सह्याद्री शिक्षण संस्थेने पुरेपूर काळजी घेतली आहे. पहिल्याच वर्षी १००टक्के निकाल लागला असुन वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम देखील पार पडल्याचे पालक सभेमध्ये सांगण्यात आले.

यावेळी एमबीएच्या प्राचार्या डॉ. अश्विनी महाडिक, सर्व प्राध्यापक, पालक तसेच विद्यार्थी हजर होते. यावर्षीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु १२वी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यासाठी पात्र आहे. मुंबई विद्यापीठ सलग्न पदवी अभ्यासक्रम १२वीनंतर मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी. व्यवसाय व मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे असल्यास आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री एम. बी. ए. कॉलेज सावर्डे ९८६०९४०१०६, ९०९६५९३०९३, ९८३४९९८८४७, ९१३७३७०१२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 20 =