You are currently viewing उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल होते तेव्हा आदित्य स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे प्लानिग करत होता

उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल होते तेव्हा आदित्य स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे प्लानिग करत होता

भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला गौप्यस्फोट

आमदार राजन साळवी उबाठा सेनेला समर्थन देत नाहीत त्याचे आधी समर्थन घ्या

कणकवली

उद्धव ठाकरे आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि त्याचे मित्र दाओसला मज्जा मारत होते. वडील आजारी असताना आदित्य ठाकरे जसलोक मध्ये बसून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे प्लानिग करत होता. असा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला. ते कणकवली येथे बोलत होते.
बारसुतील लोकांचे समर्थन मिळवल्याशिवाय बारसुचा प्रकल्प पुढे दामटवणार नाही.प्रत्येक व्येक्तीचे समाधान केले जाणार आहे. जो विषय आमदार राजन साळवी यांना कळला तो विषय त्यांच्या गट प्रमुख विनायक राऊत ,संजय राऊतला का कळत नाही ,यातच राजकारण लपलेले आहे. अशी टीका यावेळी आमदार राणे यांनी केला.
साप व प्राण्यांवर अग्रलेख लिहिण्यापेक्षा संजय राऊतने आपल्या मालकाच्या मुलाचे लग्न का होत नाही यावर अग्रलेख लिहावा.असा टोला आमदार राणे यांनी हाणला.
फडणवीस यांनी मॉरिशस वरून आदेश दिले असा आरोप करणारे संजय राऊळ हे तिथे रूम बॉय म्हणून काम करत होते काय ? बारसुत वातावरण बिघडविण्याचे आदेश मातोश्री वरून आलेत याची खात्री विनायक राऊतचा मोबाईल तपासा मग कळेल,मातोश्री वरून किती फोन गेले ते.असेही आमदार श्री राणे यांनी सांगितले.
रिफायनरी प्रकल्प इस्लामिक देशातून आला म्हणता मग आदित्य ठाकरे यांनी मागविलेल्या बेस्टच्या बसेस पाकिस्तान वरून आल्या होत्या ते तुम्हाला कस चालत.कारण खासदार संजय राऊत पाकिस्तानचा एजंट असल्यामुळे त्याला हे चालतं.याच संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे पत्राचाळीतले लोक बेघर होत होते.बारसुला जाण्याआधी मालकाला घेऊन पत्राचाळीत जाऊन दाखव.कपडे फाडून नागडे करून परत पाठवतील अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

बारसुत ७० टक्के लोकांची सहमती नाही हे संजय राऊत यांना कस कळलं ? बारसुत बाकीच्यांचे सोडा पहिलं तुम्ही राजन साळवी जे चे समर्थन उबाठा सेनेला मिळवून दाखवा.तुमच्या या आमदाराचे पहिलं परिवर्तन होत काय बघा. जे जनतेतून निवडून आलेले आहेत.राजन साळवी हे प्रकल्प होण्यासाठी आग्रही आहेत.रत्नागिरी चे पालकमंत्री उदय सामंत बारसु मध्ये लोकांशी बैठका घेणार आहेत. संवाद साधून समाधान करत आहेत.
बारसुतील लोकांचे समर्थन मिळवल्याशिवाय बारसुचा प्रकल्प पुढे दामटवणार नाही.प्रत्येक व्येक्तीचे समाधान केले जाणार आहे. जो विषय आमदार राजन साळवी यांना कळला तो विषय त्यांच्या गट प्रमुख विनायक राऊत ,संजय राऊतला का कळत नाही ,यातच राजकारण लपलेले आहे.
सामना मधून सापाची उपमा देणारा अग्रलेख आलाय.संजय राऊतला विचारेन की तुझ्या मालकाच्या मुलाला पाहून मी म्याव म्याव आवाज काढलेला तेव्हा तुझ्या मालकाला मिरच्या का लागलेल्या?तुझ्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का?त्याला म्याव म्यावचीच उपमा देणार. असे सांगून आदित्य ठाकरे च्या आवाजाची नक्कल आमदार नितेश राणे यांनी करून दाखविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा