You are currently viewing असरोंडी हायस्कूलमध्ये सौ. तांबे बाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार

असरोंडी हायस्कूलमध्ये सौ. तांबे बाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार

कणकवली

असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी च्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. भक्ती भगवान तांबे यांच्या सेवानिवृत्तीपर त्यांचा हृद्य सत्कार संस्था व प्रशालेच्या वतीने करण्यात आला. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा मार्च 2023 साठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन यावेळी साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष मा. श्री.विजय सावंत, संचालिका सौ. सुमन सावंत, संचालक श्री.विलास परब, श्री.सत्यविजय परब, मुख्याध्यापक श्री सुशांत पाटील सर, श्री. भगवान तांबे, श्री भूपेश तांबे व कुटुंबिय, पालक शिक्षक संघाचे श्री.सुनील असरोंडकर, श्री सदाशिव सावंत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. तांबे यांच्या 36 वर्षे 7 महिने व 27 दिवसांच्या सेवेत त्यांनी केलेल्या ज्ञानदानच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत माजी विद्यार्थी सौ.निता मुळेकर, सौ.रसिका नाईक व आजी विद्यार्थ्यांनी सौ. तांबे मॅडम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या जीवनात सौ. तांबे मॅडम यांचे मार्गदर्शन कसे मोलाचे ठरले याबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच संतोष गावडे, किशोर असरोंडकर, गुरुराज गर्दे, प्रज्ञा तांबे, कल्पेश जाधव, राहुल दाईंगडे, दत्ता सावंत या माजी विद्यार्थ्यांनी व्हीडीओच्या माध्यमातून पाठवलेल्या शुभेच्छा प्रोजेक्टरवर दाखवण्यात आल्या. तर बरेच माजी विद्यार्थी या कार्यक्रमात अॉनलाईन सहभागी झाले होते.
सौ. तांबे यांनी आपल्या सेवाकाळातील सहकार्याबद्दल संस्था, शाळा, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांचे आभार मानले व शाळेसाठी बहुमोल अशी *एक लाख रुपये* देणगी सुपूर्द केली. कार्यक्रमाची सुरुवात श्री भगिरथ चिंदरकर सर यांनी विज्ञान गीता ने केली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मिलिंद गावकर सर व आभार श्री कमलेश गोसावी सर यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा