You are currently viewing कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या योजना आदर्शवत – आमदार नितेश राणे 

कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या योजना आदर्शवत – आमदार नितेश राणे 

कणकवली
कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या प्रत्येक योजना इतरांनी आदर्श घ्याव्यात अशाच आहेत.प्रत्येक सभापतींनी चांगले काम केले या चांगल्या कामाचे सातत्य असेच टिकवून ठेवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली पंचायत समितीने बांधलेल्या प्रधामंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचे उदघाटन आणि प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत आणि लाभार्थ्यांचा सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,आदी व्यासपीठावर उपस्थित होते.तर सभागृहात पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके,राजू पेडणेकर, बुलंद पटेल, सुजाता हळदीवे, डॉ. संजय पोळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री राणे साहेबांचे कार्यकर्ते कोणता विकासात्मक दृष्टीकोन घेऊन चालतात हे अशा गुणात्मक कामातून दिसते.देवगड नगरपंचायत पंतप्रधान आवास योजना राबवत आहे.सर्व सरपंचांचे आरोग्य विमे उतरविणारा राज्यातील कणकवली,देवगड, वैभववाडी हा एकमेव मतदारसंघ आहे.केंद्र सारकाच्या प्रत्येक योजना अशाच प्रमाणे राबवा.पंतप्रधान श्री .मोदी यांचे या सर्व कामावर बारकाईने लक्ष असते.ते या कामाची निश्चित दाखल घेतील.काही महिन्यांपूर्वी याच जागी डेमो हाऊस चे भूमी पूजन केले होते.आज त्याचे उदघाटन केले.डेमो हाऊसचा दर्जा पाहता याचे श्रेय बांधकाम करणारे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई याना द्यावे लागेल.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी सभापती मनोज राणे यांनी या डेमो हाऊस चे उदघाटन होते याचे समाधान वाटते.आम.नितेश राणे यांचे मार्गदर्शन काम करण्यासाठी नवी दिशा देते असे ते म्हणाले.उपसभापती प्रकाश पारकर यांनी स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा