You are currently viewing टिंगल मोंतेरोच्या क्लब मध्ये चार लाखांची अफरातफर

टिंगल मोंतेरोच्या क्लब मध्ये चार लाखांची अफरातफर

धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने सुरू आहेत क्लबमध्ये जुगार.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने सोशल क्लबच्या नावावर सुरू आहेत कायदेशीर जुगार. धर्मादाय आयुक्तांनी क्लब साठी दिलेली परवानगी पुढे करत दिवसरात्र या क्लब मध्ये जुगाराचे फड बसत आहेत.
कणकवली जवळ अशाचप्रकारे सुरू असलेल्या टिंगल मोंतेरो च्या सोशल क्लब वजा जुगाराच्या अड्डयांवर तीन जणांची एक रुपया पार्टनरशीप होती. जुगाराचे फड बसता बसता टिंगलच्या क्लब मध्ये चार लाखांची झाली अफरातफर. परंतु या अफरातफरीचे सगळे खापर फोडले गेले ते कामगारांवर, आणि ते चार लाख वसूल करण्यासाठी कामगारांना वेठीस धरण्यात आले. दिवसाला आठशे रुपये याप्रमाणे कामगारांकडून महिन्याचे २४०००/- रुपये कटिंग करून घेतात.
सोशल क्लब म्हणून जे जुगाराचे अड्डे सुरू आहेत तिथे महिना आठशे प्रमाणे कामगाराला २४०००/- रुपये कटिंग करता येतात म्हणजे या सोशल जुगार क्लब मध्ये किती लाखांची उलाढाल होत असेल याचा तर अंदाजच न लावलेला बरा. धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेल्या परवान्याच्या जीवावर जिल्ह्यात किती लाखांचा जुगार दिवसाला चालतो याची कल्पनाच यावरून येते. एकीकडे पोट भरण्यासाठी सरकारी यंत्रणा छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानग्या नाकारतात तिथे जुगार खेळण्यासाठी मात्र सहज परवाने दिले जातात हे मात्र नक्कीच वाखाण्याजोगे आहे. यावरही कहर म्हणजे जिल्ह्यातील निद्रिस्त पोलीस यंत्रणा. राजरोसपणे सुरू असलेले सोशल क्लब मधील जुगार हे याच यंत्रणेतील शुक्राचार्य चालवीत असतात, फक्त तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत दोन्ही हातानी लूट घेतात आणि आशिर्वादासाठी मात्र आपला हात मोकळा सोडतात. जिल्ह्याची पोलीस यंत्रणा जेव्हा जागृत होईल तेव्हाच जिल्ह्यातील गैरधंदे बंद होऊन युवा वर्ग कामधंदे, शेती, उद्योगाकडे वळतील, अन्यथा गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशांपोटी आयुष्याची वाट लावतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा