You are currently viewing मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच कामकाज करण्याचा निर्णय

मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच कामकाज करण्याचा निर्णय

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आ.वैभव नाईक यांची मागणी केली मान्य

मालवण तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत मालवण, आचरा, पोईप असे तीन मंडळ कृषी अधिकारी व कुडाळ तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत कुडाळ, कडावल, माणगाव असे तीन मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच ते कार्यरत रहावेत अशा मागणीचे निवेदन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन दिले. आ.वैभव नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन संपूर्ण राज्यात मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच कामकाज करण्याचा निर्णय दादाजी भुसे यांनी जाहीर केला आहे.

आ.वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये मालवण तालुका कृषी अधिकारी व कुडाळ तालुका कृषी अधिकारी असे दोन तालुका कृषी अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये मालवण तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत मालवण, आचरा, पोईप असे तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यरत आहेत तर कुडाळ तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत कुडाळ, कडावल, माणगाव असे तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यरत आहेत. परंतु सदर मंडळ कृषी अधिकारी मूळ सजा असलेल्या ठिकाणी असणे आवश्यक असताना याठिकाणी कार्यरत अधिकारी यांनी मंडळ कृषी अधिकारी कार्यालये तालुक्याच्या एकाच ठिकाणी नेली आहेत. यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्याना कुडाळ तालुक्याच्या ठिकाणी व मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना मालवण तालुक्याच्या ठिकाणी नाहक फेरी मारून काम करून घेणे भाग पडते. मालवण तालुक्यामधील मालवण तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत मालवण, आचरा, पोईप असे तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यालये व कुडाळ तालुक्यामधील कुडाळ तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत कुडाळ, कडावल, माणगाव असे तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यालये आपल्या मूळ मंडळ मुख्यालयातच सुरु करणेबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना आदेशित करावे अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे त्याची दखल घेऊन मंडळ कृषी अधिकारी यांना नेमून दिलेल्या मंडळ मुख्यालयातच कामकाज करण्याचा निर्णय दादाजी भुसे यांनी जाहीर केला आहे.त्याबाबतचा आढावा घेण्याचे आदेश कृषी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा