You are currently viewing झाराप-पत्रादेवी महामार्गावर कंटेनरची डंपरला धडक…

झाराप-पत्रादेवी महामार्गावर कंटेनरची डंपरला धडक…

जखमीला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी

झाराप-पत्रादेवी महामार्गावर कंटेनरची समोरील डंपरला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नेमळे येथे घडली. या अपघातात कंटेनर चालक अजय त्रिवेदी (रा.कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला आहे.त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कंटेनर गोव्याहून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने समोरील डंपरला त्याची जोरदार धडक बसली. यात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चालकाला गंभीर दुखापत झाली. यावेळी महामार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत जखमीला रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.यावेळी महामार्ग पोलीस अरुण जाधव, श्री.गोसावी, श्री.चिंदरकर, श्री.नाईक, श्री.करवंदे, श्री.कांबळे, श्री.पाटील, श्री.बुथेलो आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा