You are currently viewing बाबुराव धुरी यांनी स्वीकारले “त्यांचे” पालकत्व

बाबुराव धुरी यांनी स्वीकारले “त्यांचे” पालकत्व

दोडामार्ग

घरात आपले कोणी नाही, मुलबाळ नाही, अशात जीवन जगायचे एकटेपण, अशा परिस्थितीत असलेल्या कळणे येथील वृद्धाची होत असलेली अबाळ शिवसेना तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांच्या कानावर आली, कायमच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यास तत्पर असलेल्या धुरी यांनी क्षणाचाही विलंब न करता या वृद्धाला आसरा कसा मिळेल यासाठी जि प सदस्यां संपदा देसाई सामाजिक कार्यकर्ते गणपत देसाई व बाळू गवस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश येऊन “रमाई वृद्धाश्रम” तुये गोवा येथे या वृद्धाची व्यवस्था केली याकामी या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिपक देसाई यांनी महत्वाचे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा