You are currently viewing कळणेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाच्या विरोधात सावंतवाडीत “एल्गार”…

कळणेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाच्या विरोधात सावंतवाडीत “एल्गार”…

कळणेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाच्या विरोधात सावंतवाडीत “एल्गार”…

गुरा-ढोरांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; मनसेचा पाठिंबा…

सावंतवाडी

कळणे मायनिंगची माती कोसळल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नाही. त्यामुळे संतप्त नुकसानग्रस्तांनी आज प्रशासनासह कंपनीच्या विरोधात “एल्गार” पुकारला. चक्क गुरा-ढोरांना घेऊन त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान जोपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी दिला.
यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, संतोष भैरवकर, दया मेस्त्री, कौस्तुभ हरमलकर, मंगेश वरक, राजेश टंगसाळे, प्रेमानंद देसाई, गोविंद मोर्ये, प्रिया नाईक, अरुण देसाई, मिलिंद नाईक,प्रकाश परब, अभय देसाई,मानसी देसाई, चंद्रकांत परब, जयसिंग देसाई, वैशाली देसाई आदी कळणेतील शेतकरी उपस्थित होते.
कळणे मायनिंगची माती येऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई न मिळाल्याने अखेर त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही, तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 11 =