You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य

*सिंधुदुर्ग महविकास आघाडीचे सामजिक आणि सांस्कृतिक उपक्रम*

*महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद*

कुडाळ :

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी २५ मार्चला कुडाळ येथे रोंबाट व राधा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक क्रीडांगणावर होणार आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस काका कुडाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाठ, शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस २६ मार्च रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिमगोत्सवातील कला राज्यात सर्वत्र जावी, यासाठी रोंबाट व राधा या कला स्पर्धा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी विकास कुडाळकर, सुनील भोगटे, रुपेश पावस्कर, अतुल बंगे, संजय भोगटे, संतोष शिरसाट, सुशील चिंदरकर, विद्याप्रसाद बांदेकर, शेखर गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी कुडाळकर म्हणाले, २५ मार्चला सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोंबाट स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व चषक, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व चषक, तृतीय क्रमांकास १० हजार रुपये सन्मानचिन्ह व चषक देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. राधा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व चषक शिवाय इतर सहभागी संघांना प्रत्येकी अडीच हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. इच्छुक संघाने २३ मार्च पर्यंत आपली नावे विनय गावडे यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =