You are currently viewing सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला अपघात; पती-पत्नी जखमी

सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला अपघात; पती-पत्नी जखमी

जखमींना काँगेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले रुग्णालयात दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी गरड येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला असून, या अपघातात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. दरम्यान तिथून आपल्या कार ने काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष महेंद्र सांगेलकर हे जात असताना, त्यांनी ही घटना पाहिले . यावेळी त्यांनी तात्काळ आपल्या वाहनांमध्ये दोन्ही जख्मीना बसवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नेल्सन फेराव व जावेद शेख यांनी देखील सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 20 =