You are currently viewing एसटी कामगार सेनेकडून चिपळूण पुरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना मदत

एसटी कामगार सेनेकडून चिपळूण पुरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना मदत

मदतीसाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियन टीमकडे मदत सुपूर्द

देवगड

महाराष्ट्र एस टी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाचे कायदेशीर सल्लागार साखरे विभागीय सचिव भगवान (आबा) धुरी तसेच महिला जिल्हा संघटक मानसी परब आणि प्रसिद्धी सचिव राम एडके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने कामगार सेना सिंधुदुर्ग विभाग मधील सर्व आगार अध्यक्ष, सचिव तसेच कामगार वर्ग यांच्या प्रयत्नाने चिपळूण येथील पूरग्रस्त एस. टी. कर्मचारी यांना मदतीसाठी कामगार सेना, सिंधुदुर्ग विभाग व दानशूर एस. टी. कामगार व अधिकारी यांच्याकडून मदती करिता एक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेतून जी रक्कम सिंधुदुर्ग विभागात जमा झाली ती आमदार वैभव नाईक उपस्थितीत गुरुवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सरपंच-उपसरपंच संघटना, शिवसेना यांच्या जवळ चिपळूण पूरग्रस्त एस टी कर्मचाऱ्यांना घरातील ईलेक्ट्रिक सामान खरेदी व दुरूस्ती साठी देण्यात आली. सदरची मदत ही पूरग्रस्त चिपळूण आगारातील कर्मचाऱ्यांकारिता देण्यात आली आहे.

यावेळी विभागीय सचिव आबा धुरी, अनुप नाईक, कुडाळ आगार अध्यक्ष एम. आर. दळवी, सचिव अमोल परब, जी. जी. नाईक, आर. जी. सामंत, राम एडके, मधुकर भगत, ए. पी. कदम, गणेश मुळे, अजित शेट्ये तसेच कामगार सेना सिंधुदुर्ग विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =