You are currently viewing या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये….

या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये….

पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सम्मान निधी योजनानुसार 9 वा हफ्ता हा 9 ऑगस्टला पाठवणार आहेत. हफत्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळी 11 वाजता जमा होणार आहे. यावेळेस मोदी शेतकऱ्यांसोबत संवादही साधणार आहेत. पंतप्रधानांकडून डीबीटीच्या माध्यमातून (DBT) शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेनुसार दर वर्षी खात्यात 6 हजार थेट खात्यात पाठवले जातात. ही 2 हजारांची रक्कम एकूण 3 हफ्त्यांमध्ये पाठवली जाते. सरकारकडून आतापर्यंत एकूण 8 हफ्ते पाठवण्यात आले आहेत.

2 ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीपर्यंत एकूण 12 कोटी 11 लाख शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तुम्ही जर या योजनेच्या निकषांनुसार पात्र आहात, पण नोंदणी केली नसेल, तर आताच करुन घ्या. तुम्ही जर या आठवड्यातच जर नोंदणी केली, तर तुम्हालाही नववा हफ्ता मिळेल. या योजनेचा अनेकांनी गैरफायदाही घेतला आहे. सरकारी आकड्यानुसार एकूण 42 लाख जणांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत ऑनलाईन तपासू शकता. शासनाच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तुमचं नाव पाहू शकता. वेबसाइट ओपन झाल्यानंतर मेन्यू (Menu Bar) मध्ये फार्मर कॉर्नरवर (Farmer Corner) क्लिक करावं. त्यानंतर पुढे लाभार्थी सूची या लिंकवर क्लिक करावं. तिथे तुम्हाला आवश्यक ती माहिती विचारण्यात येईल. योग्य ती माहिती टाकल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट (Get Reprot) क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिसेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in नोंदणी करावी लागेल. त्यसााठी वेबसाईटवर FARMER CORNERS हा मेन्यू दिसेल. तिथे NEW FARMER REGISTRATION हा पर्याय दिसेल. इथे तुम्हाला NEW FARMER REGISTRATION हा पर्याय दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यावर आधार कार्ड आणि आवश्यक माहिती विचारली जाईल. ही माहिती भरल्यानंतर नवा फॉर्म ओपन होईल. येथे तुम्हाला आवश्यक ती माहिती टाकावी लागेल. यामध्ये बँक अकाउंट नंबर मागितला जाईल.

सर्व माहिती भरल्यानंतर ते सेव्ह करावे लागेल. यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल. यामध्ये तुमच्या शेत जमिनीबाबतची माहिती विचारली जाईल. इथेही आवश्यक माहिती दिल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. तेव्हा तुम्ही जर या आतापर्यंत योजनेसाठी नोंदणी केली नसेल, तर आत्ताच करा अन् योजनेचा लाभ घ्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 6 =