You are currently viewing पूरस्थितीमुळे माणगाव विभागात झालेल्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

पूरस्थितीमुळे माणगाव विभागात झालेल्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

आंबेरी पूल रस्त्याचे काम मंजूर ; दिवाळीच्या दरम्याने काम सुरु करण्याच्या आ.वैभव नाईक यांच्या सूचना

पुरस्थितीमुळे माणगाव विभागामध्ये झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. यावेळी माणगाव,गोठोस, वाडोस, कालेली, मोरे, आंबेरी, नानेली या गावांमध्ये भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. पावसामुळे आंबेरी पुलावरील खचलेल्या रस्त्याची आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माने, अनामिका जाधव, श्री. बिराडे, यांच्यासमवेत पाहणी केली. हे काम मंजूर झाले असून त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.दिवाळीच्या दरम्याने काम सुरु करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
गोठोस येथिल अमित देसाई,कालेली येथील रमेश परब, आंबेरी येथील श्रीम.कोरेबिन डिसोझा, माणगाव येथील बापू बागवे यांची घरे कोसळून नुकसान झाले त्यांची भेट घेऊन आ. वैभव नाईक यांनी त्यांना धीर दिला. पंचनाम्याबाबत माहिती घेतली. गरजू कुटुंबांना तूरडाळ,चणे, वाटाणे, साखर,चहा पावडर, तेल पिशवी, मेणबत्ती, बिस्कीट इत्यादी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, विभाग प्रमुख अजित करमलकर, रामा धुरी, कृष्णा धुरी,कौशल जोशी, योगेश धुरी,वसोली सरपंच अजित परब, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =