You are currently viewing मोकाट गुरे प्रश्नी नागरिकांचे मालवण नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण

मोकाट गुरे प्रश्नी नागरिकांचे मालवण नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण

मालवण

मालवण शहरातील मोकाट गुरे प्रश्नी शहरातील धुरीवाडा खोतमठ येथील कमलाकांत खोत व नागरिकांनी सोमवारी मालवण नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषण छेडले आहे.दरम्यान, या उपोषणाला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर यासह माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पाठींबा दर्शवला.येथील नागरिक यांनी यापूर्वी अनेक वेळा मालवण पालिका प्रशासनास निवेदन दिले. मात्र मोकाट गुरे बाबत पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने उपोषण छेडत असल्याचे उपोषणकर्ते कमलाकांत खोत यांनी माहिती देताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 1 =