You are currently viewing कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे….

कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे….

आमदार नितेश राणेंच्या सूचनेनुसार नगराध्यक्षानी काढली समजूत ; मात्र तक्रारी बद्दल मुख्याधिकारी निर्णय घेतील…

कणकवली :

कणकवली नगरपंचायत कर्मचारी कालपासून काम बंद आंदोलनावर यशस्वी तोडगा कणकवली नगराध्यक्षांनी काढला आहे. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांची समजूत काढली आहे.कणकवली नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्मचारी संतप्त झाले होते.

बुधवारी दुपारपासून कणकवली नगरपंचायतचे काम सर्व कर्मचाऱ्यांनी बंद करत निषेध नोंदवला होता. दरम्यान गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समवेत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी हा वाद मिटवण्याचे सूचना केल्या आहेत. त्यानुसार कामगारांच्या आक्रमक भूमिकेवर एक समजुतीची भूमिका नगराध्यक्षांनी घेतली.अखेर कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. मात्र यापुढे अशा प्रकारचा त्रास विरोधी नगरसेवकांनी केल्यास कर्मचारी शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अभिजित मुसळे आदी उपस्थित होते. तसेच कर्मचारी सतीश कांबळे, किशोर धुमाळे, मयूर शिंदे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 9 =