You are currently viewing सावंतवाडी अर्बन बँक फोंडाघाट शाखेमध्ये पिग्मी एजंटांची सीईओ शी बाचाबाची

सावंतवाडी अर्बन बँक फोंडाघाट शाखेमध्ये पिग्मी एजंटांची सीईओ शी बाचाबाची

सावंतवाडी अर्बन बँक फोंडाघाट शाखेमध्ये पिग्मी एजंटांची सीईओ शी बाचाबाची

माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी काढला सुवर्ण मध्य

दिनांक 12 रोजी खातेदारांना पैसे मिळतील असे सीईओ पास्ते यांनी दिले आश्वासन

फोंडाघाट

सावंतवाडी अर्बन बैंक लिक्विडेशनमध्ये गेल्याने आज फोंडाघाट अर्बन बँकेच्या शाखेत पिग्मी एजंटांची बँकेतील कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली. यावेळी माजी संचालक असलेले सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांना बोलावण्यात आले. खातेदारांच्या नावावर असलेले पैसे मिळण्यासंदर्भात पिग्मी एजंट एजंटांनी सीईओ पास्ते यांची भेट घेतली होती. पैसे मिळत नसल्याने सर्वच ग्राहक व पिग्मी एजंट आक्रमक झाले होते. सर्व बँक कर्मचाऱ्यांना आत मध्ये कोंडून ठेवूया इथपर्यंत चर्चा झाल्या. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी यातून सुवर्ण मध्य काढू सीईओ पास्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिनांक 12 रोजी शनिवारी खातेदारांना पैसे मिळतील असे आश्वासन पास्ते यांनी दिले.

या आधीच अर्बन बँकेचे माजी संचालक नाडकर्णी यांनी 16 ऑगस्टला आपण बँकेसमोर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. या उपोषणावेळी अर्बन बँकेचे चेअरमन उपस्थित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या उपोषणाला .माजी संचालक श्री.संदेश पारकर आमदार वैभव नाईक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आज या सर्व घडलेल्या प्रकारामुळे सीईओ ची पाचावर धारण बसली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा