You are currently viewing इन्सुलीत ७२ लाखाची दारू जप्त, राजस्थानातील एक ताब्यात

इन्सुलीत ७२ लाखाची दारू जप्त, राजस्थानातील एक ताब्यात

इन्सुलीत ७२ लाखाची दारू जप्त, राजस्थानातील एक ताब्यात

बांदा

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने इन्सुली येथे तब्बल ७२ लाखाची दारू जप्त केली. यात गाडी, मोबाईल आणि दारू मिळून तब्बल १ कोटीच्या मुद्देमालाचा समावेश आहे. याप्रकरणी राजस्थान येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री ९ वाजता इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली. जगदीश देवाराम बिश्रोई (रा. राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना आज पहाटे ५ च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे दहाचाकी बंद बॉडीच्या वाहनाची तपासणी केली असता दहाचाकी बंदबॉडीचे वाहनास पाठीमागील दोन्ही बंद दरवाज्यांना बॉटल सील लावलेले दिसून आले. वाहन चालकाने त्या वाहनामध्ये मशिनरी, स्क्रॅप भरलेले असल्याचे सांगितले. वाहनचालकाने दिलेल्या ट्रान्सपोर्ट बिल्टी नुसार संशय आल्याने त्याच्याजवळ अधिक विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे या वाहनाच्या मागील दरवाज्यावर लावलेले बॉटल सील तोडून दरवाजा उघडून पाहिले असता ड्रीम्स डिस्टीलरीज गोवा निर्मित गोवा बनावटीचे विदेशी मद्य मिळून आले. या प्रकरणी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दिपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर करीत आहेत.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा