You are currently viewing शिवराज्यभिषेकानिमित्त स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन व आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार 
Oplus_16908288

शिवराज्यभिषेकानिमित्त स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन व आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार 

अमरावती:

येत्या 6 जून रोजी येणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पा अंतर्गत व प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तसेच त्रिवेणी फाउंडेशनच्या वतीने चौथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून याच संमेलनामध्ये यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हे संमेलन व सत्कार अमरावती परतवाडा रोडवरील वलगाव बस स्टॅन्ड जवळील सिकची रिसॉर्ट या भव्य परिसरात होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दिल्लीच्या सुप्रसिद्ध आयएएस ऑफिसर श्रीमती भाग्यश्री बानाईत आहेत हया उपस्थित राहणार आहेत .तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे सीआरपीएफचे कमांडंट डॉ. चेतन शेलोटकर यांना निमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमाला नागपूरचे आरटीओ श्री किरण बिडकर तसेच महाराष्ट्र बँकेचे विभागीय संचालक श्री महेशकुमार डांगे व माजी सनदी अधिकारी श्री गणेश चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आय ए एस ही परीक्षा पास झालेले सहा आयएएस विद्यार्थी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यापैकी हेमकृष्ण पिसदे गोंदिया प्रज्वल नासरे वर्धा व रेणुका केकन अकोला जिल्हा यांनी सत्काराला संमती दिली आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी खानदेशातील मिशन आयएएस च्या शाखेने यावर्षी आय ए एस झालेले श्री शुभम बेहेरे कुमारी मोहिनी जगताप व कुणाल अहिरवार यांना निमंत्रित केले आहे.

हा कार्यक्रम शिवराज्याभिषेक दिनी म्हणजे सहा जून रोजी दुपारी बारा वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये संपन्न हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी व अध्यापकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे विनंती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ.पंजाबराव कथे संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर व त्रिवेणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा