You are currently viewing कोलगाव कशेलवाडीत जाणारा रस्ता खचला

कोलगाव कशेलवाडीत जाणारा रस्ता खचला

कोलगाव

चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे
कोलगाव कशेलवाडीत जाणारा रस्ता एका बाजुने खचला. याबाबत तात्काळ या रस्त्याची डागडुजी न केल्यास संपूर्ण रस्ताच कोसळून या वाडीतील चाळीस घरांचा गावाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

कोलगाव कशेलवाडीत जाणारा हा एकमेव मार्ग आहे असुन रस्त्याचा अर्धा अधिक भाग जमीनदोस्त होऊन दगड माती नजीकच्या विहिरीत जाऊन विहीर पूर्णतः बुझली आहे.

या रस्त्याच्या खालील रस्त्याला झरे निर्माण झाल्याने हा रस्ता खचला आहे. या वाडीत जाण्यासाठी अन्य दुसरा मार्ग नसल्याने या वाड्यातील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी संदीप राणे यांनी केली आहे. दरम्यान कोलगाव सरपंच संतोष राउळ यांच्याशी संपर्क साधला असता हा रस्ता खचल्यामुळे नजिकच्या काळात कशेलवाडी ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रस्त्यालगत काँक्रीटची भिंत बांधून हा रस्ता दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =