You are currently viewing सिंधूदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण संपादित जमिनीत अतिक्रमणाविरोधात मनसे स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठिशी

सिंधूदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण संपादित जमिनीत अतिक्रमणाविरोधात मनसे स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठिशी

शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने प्राधिकरणास दिलेल्या जमिनी घुसखोरी होऊन हडपल्या जात असतील तर त्या शेतकऱ्यांना परत करा..मनसेची मागणी

प्राधिकरणाचे अधिकारी अर्थपूर्ण संबंधातून बघ्याची भूमिका घेत आहेत का ? मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा सवाल

ओरोस :

ओरोस जिजामाता चौक के सिडको वसाहत महामार्ग दरम्यान प्राधिकरण क्षेत्राच्या अखत्यारित येणाऱ्या जमिनीत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम बेकायदेशीरपणे चालू असून देखील नवनगर विकास प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी बघ्याची भूमिका येत असल्याने स्थानिक शेतकरी एकवटले आहेत. यासंदर्भात स्थानिक शेतकरी प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला असल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत.मनसे या शेतकऱ्यांची पाठीशी उभी असून प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हकीकत मांडणार आहे. ओरोस जिजामाता चौक परिसरालगत सर्वे नंबर 44/1 अ मध्ये खाजगी व्यावसायिकाकडून बेकायदेशीर वाणिज्य बांधकाम होत असून नवनगर प्राधिकरणाच्या संपादित मार्गामध्ये 18 मीटर अतिक्रमण केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरचे अतिक्रमण होऊन होत असलेले बांधकाम जबाबदार अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्याकडे डोळेझाक करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.कवडीमोल भावाने घेतलेल्या आमच्या जमिनी जर खाजगी व्यवसायिक घुसखोरी करून लाटत असतील तर त्या आम्हाला परत कराव्यात अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत. शिवाय या परिसरात भरावासाठी अनधिकृतपणे शेकडो ब्रास माती उत्खनन करून लाखोंचा शासन महसूल देखिल बुडविला आहे तर सामान्य जनतेकडे महसूल वसुलीसाठी तगादा लावणारे महसूलचे जबाबदार अधिकारी झोपेचं सोंग घेऊन त्या परिसरातुन प्रवास करतात का असा मनसेचा सवाल आहे. मनसे शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असून मायनिंग लॉबीला कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन सहकार्य करून शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या “त्या” मुजोर अधिकाऱ्याविरोधात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + thirteen =