You are currently viewing विगसा यांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

विगसा यांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

पुणे:

 

ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी व व्याख्याता श्री. वि. ग सातपुते यांचा अमृत महोत्सव सोहळा विगसा यांच्या निवास स्थानी संपन्न झाला. या प्रसंगी श्री साई बाबांच्या पादुकांचे पूजन व महाआरती संपन्न झाली.

 

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सर्वश्री डॉ.अशोक कामत, डॉ.श्री न. म. जोशी, श्री. सू.द. वैद्य, डॉ. दामोदर खडसे तसेच सामाजिक , शैक्षणीक , धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.महेंद्र ठाकूरदास यांनी केले तर सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद मिसाळ यांनी केले.

 

अमृत महोत्सवानिम्मित श्री. वि. ग सातपुते यांचा काव्यानंद प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे *जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मान करण्यात आले त्याच प्रमाणे . महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे आणि भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर ज्येष्ठ नागरिक आघाडी तर्फे विगसातपुते यांच्या कार्याबद्दल गौरवास्पद सन्मानपत्रे दिली गेली व या सर्व सन्मानपत्रांचे वाचन काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल , पोपटराव गायकवाड तसेच कवयित्री सविता कुंजीर यांनी केले. मदनलालजी डांगी यांनी केले.महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे यांच्यावतीने ही आप्पांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अनेक मान्यवर साहित्यकारांनी आपापली मनोगते व्यक्त झाली.

*काव्यानंद प्रतिष्ठान पुणे या ख्यातनाम साहित्यिक संस्थेतर्फे काव्यानंद ई मासिकाच्या वतीने विगसा आप्पांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या काव्यानंदी भावस्पर्श या विगसा गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*

 

या प्रसंगी राजकीय, सामाजिक, साहित्यिक , काव्य , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विशेष म्हणजे विगसांचे 75 वर्षीय बालमित्र देखील उपस्थित होते.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री डॉ. महेंद्र ठाकूरदास, सुनील खंडेलवाल, त्र्यंबक बोरीकर , कौस्तुभ सातपुते, देवेंद्र सातपुते, चंद्रशेखर सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले.

महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 9 =