You are currently viewing कणकवली नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी आम. नीतेश राणे यांची फेरनिवड

कणकवली नगरवाचनालयाच्या अध्यक्षपदी आम. नीतेश राणे यांची फेरनिवड

कार्यवाहपदी महम्मद हनीफ पीरखान, तर सहकार्यवाहपदी डी.पी.तानवडे यांची निवड

कणकवली

नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी आमदार नीतेश राणे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
वाचनालयच्या कार्यकारिणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यासाठी शुक्रवार १० डिसेंबरला मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासभेत आमदार नीतेश राणे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर कार्यवाहपदी महम्मद हनीफ आदम पीरखान यांची निवड करण्यात आली असून सह.कार्यवाह म्हणून डी.पी.तानवडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नीतेश राणे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानून पुढील तीन वर्षासाठीच्या कामाची रुपरेषा मनोगत व्यक्त करताना विशद केली. त्यानंतर कार्यकारिणीतील नवीन सदस्यांचे अभिनंदन केले. नगर वाचनालयाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

यात पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे.तर विशेष सल्लगार-डॉ.विद्याधर तायशेटे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य कल्पना सावंत, मेघा गांगण, महेश काणेकर , अभिजीत मुसळे, रविंद्रनाथ मुसळे, पिराजी कांबळे, वैजयंती करंदीकर.यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा