You are currently viewing कोकण कन्या जान्हवी व समृद्धी ठाकूर यांचा पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश सावंत यांच्या वतीने सन्मान

कोकण कन्या जान्हवी व समृद्धी ठाकूर यांचा पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश सावंत यांच्या वतीने सन्मान

कुडाळ

कोकणच्या कन्या कु.जान्हवी ठाकूर(भरतनाट्यम नृत्यांगना) आणि कु.समृद्धी ठाकूर (पखवाज वादिका) यांचा श्री जगन्नाथ संगीत विद्यालय संचालक व पखवाज अलंकार प्रशिक्षक श्री महेश सावंत व विद्यार्थीवर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

मुंबई यूनिवर्सिटी युथ फ़ैस्टिवल मध्ये आताच झालेल्या स्पर्धा मध्ये कोकणकन्या नेरुर गावच्या सुकन्या कु.जान्हवी ठाकूर हिने भरतनाटयम नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. जान्हवी चे भरतनाट्यम शिक्षण सिध्दाई डान्स अकादमी, कुडाळ, प्रशिक्षिका कु.कविता मोहन राऊळ यांज कडे सूरु आहे. अनेक नृत्य स्पर्धा मधून जान्हवीने आपल्या नृत्य कौशल्याने अनेक वैयक्तीक तसेच ग्रुप डांस पारितोषिके मिळवली आहेत व संगीत कलेत ती महत्वपूर्ण योगदान सातत्याने देत आहे. तसेच तिची सख्खी बहिण कु.समृद्धी ठाकूर ही सुद्धा श्री महेश सावंत यांच्याकडे शास्त्रीय पखवाज वादन शिकत आहे व दोन्ही बहिणी आपल्या आईवडीलांचे स्वप्न पुर्ण करत यशस्वी वाटचाल संगीत कलेत करत आहेत.

युथ फ़ैस्टिवल ला आपले सादरीकरण मुंबई सारख्या अनेक मातब्बर कलाकारांच्या दुनियेत केले व संगीत श्रोत्यांचे कौतुक व दाद मिळवली. यावेळी हार्मोनियम व पढँत साथ श्री अमित उमळकर यानी केली तसेच पखवाज साथ मृदंगम अंगाने कु.समृद्धी ने केली व तट्टकली साथ सिध्दाई डान्स अकादमीच्या प्रशिक्षिका कु.कविता राऊळ यानी केली. त्यांच्या या कर्तुत्वाला श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक व प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत व विद्यार्थीवर्ग यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा