You are currently viewing ‘सुरक्षित महाराष्ट्र’ स्तर 3 च्या निर्बंध आदेशास 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

‘सुरक्षित महाराष्ट्र’ स्तर 3 च्या निर्बंध आदेशास 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

जिल्‍ह्यात सरासरी पॉझिटीव्हीटी रेट 6.92 टक्के इतका असल्याने सद्यःस्थितीत जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट होत असल्याने 16 जुलै रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशास दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 7 वाजले पासून 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.

राज्यात कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सुरक्षित महाराष्ट्र निर्बंध स्तर आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे जिल्ह्याचा साप्ताहित पॉझिटीव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येनुसार ठरवण्याबाबत व या पॉझिटीव्ह रेट नुसार जिल्ह्याच्या निर्बंधाचा स्तर निश्चित करण्याच्या सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील 2 सप्ताहातील प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर विचारात घेऊन स्तर निश्चित करण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 9 जुलै ते 15 जुलै या सप्ताहातील कोविड बाधित रुग्णांचा सरासरी पॉझिटीव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) 7.42 टक्के आहे. 15 जुलै ते 21 जुलै या कालावधीतील सरासरी पॉझिटीव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) हा 6.42 टक्के इतका आहे. या पॉझिटीव्हीटी रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटीव्हीटी रेट 6.92 टक्के इतका असल्याने जिल्हा स्तर तीनमध्ये समाविष्ट होत आहे. त्यानुसार 16 जुलै रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशास, 26 जुलै रोजी सकाळी 7 वाजलेपासून 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही यात देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 3 =