You are currently viewing बीडीएस परीक्षेत सेंट उर्सला स्कुलच्या दुर्वा मुसळेला मिळाले गोल्ड मेडल..

बीडीएस परीक्षेत सेंट उर्सला स्कुलच्या दुर्वा मुसळेला मिळाले गोल्ड मेडल..

कणकवली

कणकवली शहरानजीकच्या सेंट उर्सला इंग्लिश मीडियम स्कुल वरवडे येथे इयत्ता 7 वीत शिकणारी दुर्वा नागेश मुसळे या विद्यार्थिनीने इंटरनॅशनल मॅथ्स , सायन्स आणि इंग्लिश ओलंपियाड या तिन्ही परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळविले आहे .दुर्वा हिने बीडीएस परीक्षेत 100 पैकी 93 गुण प्राप्त केले आहेत. कु . दुर्वा ही मुळातच हुशार असून तिने क्रमिक अभ्यासक्रमात सातत्याने यश मिळविले आहे . त्याच बरोबर विविध स्पर्धामध्ये सातत्याने यश मिळविले आहे . तिने दरवर्षी ऑलिम्पियाडमध्ये स्कूलमध्ये गोल्ड मेडल , ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे . इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिप जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ती चमकली होती . होमी भाभा स्पर्धेत प्रथम स्टेजमध्ये निवड झाली होती , मंथन परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते.केंद्र शाळा कासार्डे नंबर 1 च्या शिक्षिका श्रीम . पूजा नागेश मुसळे यांची मुलगी असून तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून कु. दुर्वा हिचे अभिनंदन करण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =