You are currently viewing स्थानिक भाजी विक्रेत्यांनी लोकांना स्वस्त व ताजी भाजी देण्याचा प्रयत्न करावा

स्थानिक भाजी विक्रेत्यांनी लोकांना स्वस्त व ताजी भाजी देण्याचा प्रयत्न करावा

भाजप देवगड जामसंडे यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

देवगड

देवगड जामसंडे परिसरात स्थानिक भाजीविक्रेते व परजिल्ह्यातील भाजीविक्रेते यांच्यामध्ये वाद सुरू आहेत यामध्ये शिवसेनेने स्थानिक भाजीविक्रेत्यांची बाजू घेत परजिल्ह्यातील भाजी विक्रेत्यांना हुसकावून लावू अशी भूमिका घेतली आणि मनसे तालुका प्रमुखांनी बाहेरील भाजीविक्रेत्यांची बाजू घेत,त्यांना कोण हुसकावून लावतो ते बघतो.अशी भूमिका जाहीर केली.

यासंदर्भात भाजपा देवगड जामसंडे शहर यांची कोअर् कमिटीची बैठक घेण्यात आली यामध्ये स्थानिक भाजीविक्रेते आणि बाहेरील भाजीविक्रेते व स्थानिक जनता यापैकी कोणाचे नुकसान होणार नाही अशी भूमिका घ्यावी असे ठरले त्यानुसार दर शुक्रवारी बाहेरील भाजी विक्रेत्यांना योग्य दरात भाजी विक्री करण्याची परवानगी नगरपंचायतीने द्यावी व त्यांना जागा ठरवून द्यावी. असा निर्णय घेण्यात आला कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आठवडा बाजार पूर्ववत होईपर्यंत अशी व्यवस्था राहील. मात्र शुक्रवार व्यतिरिक्त स्थानिक भाजी विक्रेत्यांनी लोकांना स्वस्त दरात ताजी भाजी देण्यासाठी प्रयत्न करावे. कोविड च्या काळात लोकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. याचा विचार स्थानिक भाजी विक्रेत्यांनी करावा. अशी माहिती शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी दिली.

या बैठकीला माजी आमदार ऍड. अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,भाजप देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सौ उष: कला केळुसकर (महिला भाजप तालुकाध्यक्ष देवगड मंडल) भाजप देवगड तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल देवगड जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर,नगरसेवक योगेश चांदोसकर, गटप्रमुख ज्ञानेश्वर खवळे शक्ती केंद्रप्रमुख सुभाष धुरी, शक्ती केंद्रप्रमुख गणपत गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − nine =