You are currently viewing खा. राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाचा फोंडाघाट मध्ये जल्लोष

खा. राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाचा फोंडाघाट मध्ये जल्लोष

कणकवली

खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच फोंडाघाटमध्ये भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना पेढे भरवत नारायण राणे यांच्या अभिनंदनाच्या जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्या सुजाता हळदिवे, बबन हळदिवे, फोंडाघाट सरपंच संतोष आंग्रे, वाघेरी सरपंच संतोष राणे, विश्वनाथ जाधव, प्रदीप राणे, ओमकार राणे, सिद्देश पावसकर, विजय फोडेकर, मिलिंद लाड, नीलेश लाड, नितिन पारकर, दिलीप पारकर, उमेश राऊत, सुनील लाड, अजित नाडकर्णी, राजेश प्रभु देसाई, ऋतु तेंडुलकर, संजय खाडये, सौरभ पारकर, गणेश हळदिवे, गजानन सावंत, प्रथमेश पारकर आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 18 =