You are currently viewing रेल्वेची धडक बसून कुडाळमध्ये युवकाचा जागीच मृत्यू…

रेल्वेची धडक बसून कुडाळमध्ये युवकाचा जागीच मृत्यू…

कुडाळ

रेल्वेची धडक बसून कुडाळ एमआयडीसी परिसरात युवकाचा रेल्वे ट्रॅकवर जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघड झाला. वैभव सावंत (वय २५), असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्याने आत्महत्या केली असावी,असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. याबाबतची खबर त्याचे नातेवाईक प्रदीप सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + one =