You are currently viewing 10 वी आणि 12 वीची वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार

10 वी आणि 12 वीची वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार

सीबीएसईचा मोठा निर्णय…

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी 5 जुलै रोजी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार यंदा वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 ला दोन भागात विभागलं आहे. प्रत्येक सत्रात जवळपास 50 टक्के अभ्यासक्रम ठेवला जाईल. मागील सत्राप्रमाणे 2021-22 च्या अभ्यासक्रमातही कपात केलीय. याबाबत या महिन्यात नोटिफिकेशनही काढण्यात येणार आहे.

सीबीएसईनुसार 2021-22 शैक्षणिक वर्षात व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून विभागणी केलीय. विभाजित अभ्यासक्रमाच्या आधारावरच सीबीएसई वर्षात दोन वेळा परीक्षा आयोजित करणार आहे. सीबीएसईने म्हटलं, “शैक्षणिक सत्राच्या शेवटापर्यंत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्याची शक्यता कायम रहावी म्हणून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असं असलं तरी या शैक्षणिक वर्षात शाळांना बोर्डाचा अभ्यासक्रमच पूर्ण करायचा आहे. शाळांना अभ्यासक्रम लागू करण्यासाठी NCERT कडून इनपूट घेता येणार आहे.

*प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क अधिक विश्वासार्ह होणार*

इंटरनल असेसमेंट/ प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट वर्कला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय घोषणा केलेल्या निर्देशांमुळे या सर्व गोष्टींना सारखे गुण देणं वैध होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा