You are currently viewing वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर दाणोली येथे झाड कोसळल्याने आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर दाणोली येथे झाड कोसळल्याने आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

सावंतवाडी

वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर दाणोली येथे सावंतवाडी-आंबोली मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने सुमारे एक तास वाहतुक ठप्प झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना कल्पना देवून सुध्दा कोणीच त्या ठिकाणी आले नसल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेपासून काही अंतरावर घडला आहे. याबाबतची माहिती कॉंग्रेसचे युवा पदाधिकारी अ‍ॅड. गुरूनाथ आईर यांनी दिली. दरम्यान खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी तेथील ग्रामस्थांकडुन प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =