You are currently viewing १ ते ५ कालावधीत ब्राम्हण देव मंदिर सुकळवाड दशावतारी नाटक महोत्सवाचे आयोजन

१ ते ५ कालावधीत ब्राम्हण देव मंदिर सुकळवाड दशावतारी नाटक महोत्सवाचे आयोजन

 

 

श्री ब्राह्मणदेव सुकळवाड येथील वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा ५ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त १ ते ५ मे या कालावधीत कै. बाबाजी हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये १ मे रोजी मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमांड, २ मे रोजी वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली, ३ मे रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला, ४ मे रोजी महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी, तर ५ मे रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण, इत्यादी नाट्य मंडळाचे रोज सकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग होणार आहेत.

वरील सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव ब्राह्मण सेवा समिती सुकळवाडच्या वतीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + sixteen =