You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अँड.संतोष सावंत तर कार्यवाह प्रा.सौ प्रतिभा चव्हाण

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अँड.संतोष सावंत तर कार्यवाह प्रा.सौ प्रतिभा चव्हाण

कोमसाप सावंतवाडी तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. गेली तीन वर्षे सावंतवाडी तालुका कोमसापचे अध्यक्ष म्हणून माजी प्रा. सुभाष गोवेकर यांनी उत्तमरित्या काम पाहिले होते. दिनांक १३ मार्च रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२२ ते २०२५ तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवडण्यात आली. यात सावंतवाडी येथील तरुण भारतचे पत्रकार ऍड.संतोष सावंत यांची कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी तर प्रा.प्रतिभा चव्हाण यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दर्पणकार पुरस्कार प्राप्त पत्रकार अभिमन्यू लोंढे तसेच कोषाध्यक्षपदी डॉ. दिपक तुपकर, सहकार्यवाह राजू तावडे यांची निवड जाहीर करण्यात आली.
कोमसाप सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍड.नकुल पार्सेकर, दीपक पटेकर ऍड.अरुण पणदुरकर, प्रा. रुपेश पाटील, पत्रकार विनायक गावस सौ.मेघना राऊळ, सौ प्रज्ञा मातोंडकर, भरत गावडे, विठ्ठल कदम यांची निवड करण्यात आली. कार्यकारणीचे सल्लागार म्हणून डॉ. जी ए बुवा, प्रा. सुभाष गोवेकर, वाय पी नाईक सर, साहित्यिका उषा परब यांची निवड झाली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदन केले तसेच आपले मनोगत व्यक्त करताना नूतन कार्यकारिणीने साहित्य चळवळ जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी प्रास्ताविक करून केली. माजी तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली तसेच खर्चाचा अहवाल मांडला त्याला सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंजुरी दिली. प्रा.सुभाष गोवेकर यांनी मागील तीन वर्ष सहकार्य केलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कार्यवाह प्रा.सौ प्रतिभा चव्हाण यांनी मागील सभेच्या इतिवृत्त वाचन केले व गतवर्षी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. लवकरच सावंतवाडी तालुका कोमसाप नूतन कार्यकारिणीची सभा आयोजित करून विविध समित्या गठीत करण्याचे ठरविण्यात आले त्याच बरोबर ही साहित्य चळवळ पुढे नेत असताना नवीन साहित्यिक पुढे येणे आवश्यक असल्याचे मत मांडत असतानाच वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. भविष्यात कोमसापची साहित्यिक चळवळ जोमाने सुरू ठेवण्यासाठी युवा साहित्यिक निर्माण करून पुढे आणावेत व नवीन सदस्य करण्याचे ठरविण्यात आले. नव्या पिढीचा वाचन संस्कृतीकडे होत असलेला दुर्लक्ष महाराष्ट्राच्या साहित्य चळवळी साठी नक्कीच भूषणावह नाही, त्यामुळे नवनवीन लेखक, कवी आदी साहित्यिकांनी पुढे येणे ही काळाची गरज बनली आहे. नूतन तालुकाध्यक्ष ऍड.संतोष सावंत यांनी आजपर्यंत कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुरू असलेले कार्य यापुढेही त्याच प्रकारे जोमाने पुढे नेणार असल्याची ग्वाही दिली. तसेच आपली अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता जिल्हा कार्यवाह भरत गावडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी माजी तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर संतोष सावंत प्रतिभा चव्हाण कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के मसके जिल्हा कार्यवाह उषा परब भरत गावडे विठ्ठल कदम डॉक्टर जी बुवा प्राध्यापक अरुण पंदुरकर राजू तावडे एडवोकेट नकुल पार्सेकर अभिमन्यू लोंढेरामनाथ पारकर प्राध्यापक रुपेश पाटील दीपक पटेकर विनायक गावस किल्लेदार सर प्रज्ञा मातोंडकर सौ मेघना राऊळ आधी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा