You are currently viewing विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांकडून स्कॅनर प्रिंटर भेट…

विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांकडून स्कॅनर प्रिंटर भेट…

कणकवली प्रतिनिधी: हरकुळ खुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित विद्यामंदिर हरकुळखुर्द प्रशालेस सन १९८५-८६ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी गेट-टु-गेदर च्या कार्यक्रमाच्या निमित शाळेत स्कॅनर प्रिंटर भेट दिला. सदरचा कार्यक्रम गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी सोशल डिस्टन्स ठेवून व मास्क लावून संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित हरकुळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई अध्यक्ष विठ्ठल शिवाजी रासम व जनरल सचिव प्रभाकर काशिराम वालावलकर आणि शालेय समिती अध्यक्ष विलास वासुदेव रासम, सभासद विद्याधर गोपाळ वालावलकर, प्रकाश सहदेव दळवी जयप्रकाश तुकाराम हुले हे उपस्थित होते. त्याप्रमाणे माजी विद्यार्थी राजन चंद्रकांत रासम, विजय वसंत रासम, श्रीकांत महादेव दळवी, अशोक आबा सावंत, आत्माराम सोनू परब व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक किशोर अनंत यादव यांनी सर्व मान्यवरांचे व माजी विद्यार्थ्यांचे शब्दसुमनाने स्वागत केले. तसेच सन. १९८५-८६चे माजी विद्यार्थ्यांनी दिलेली भेटवस्तू शाळेसाठी उपयुक्त आहे. शाळेसाठी फायदा होऊ शकतो. माजी विद्यार्थ्याचे त्यांनी आभार मानले. तसेच माजी विद्यार्थी राजन चंद्रकांत रासम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील भौतिक वास्तूंचे त्यांनी उल्लेख केला. पुढे शक्य होईल तितके आम्ही शाळेसाठी मदत करु शाळेमध्ये चांगले उपक्रम घेतले जातात. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित अध्यक्ष विठ्ठल शिवाजी रासम यांनी देखील मनोगत व्यक्त केले त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले तसेच त्यांनी नवीन उपक्रम चालू केला त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 18 =