कोरोना योद्धा म्हणून काम करणार्‍या शिक्षकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात…

कोरोना योद्धा म्हणून काम करणार्‍या शिक्षकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात…

– नारायण नाईक

बांदा
मागील वर्षी अनेक गैरसोयींचा सामना करत प्राथमिक शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून कामकाज पाहिले आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र याठिकाणी कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत .
पण ही कामे करताना शिक्षकांना काही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदार सावंतवाडी यांना वारंवार निवेदन देऊन व प्रत्यक्ष चर्चा करून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
आज पुन्हा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन शिक्षकांना जवळच्या ठिकाणी ड्यूटी द्यावी, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षकांना अल्पोपोहाराची सोय करावी तसेच गंभीर आजारी शिक्षकांना ड्यूटी लावू नयेत, सर्व शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे, शक्यतो महिलांना ड्यूटीतून वगळावे अशा विविध विषयांवर जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष सतिश राऊळ, गोविंद शेर्लेकर, जे.डी.पाटील आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा