You are currently viewing शासनाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली तात्पुरती स्थगित

शासनाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली तात्पुरती स्थगित

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची झालेली बदली रद्द करीत त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदी तात्पुरती पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने आज याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र शासनाने काल (गुरुवार) राज्यातील आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली करीत त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीण भागाचे अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना पदोन्नतीने नियुक्ती दिली होती. तर दाभाडे यांना पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्ह्याला पवन बनसोड यांच्या रूपाने नवीन पोलीस अधीक्षक मिळणार होते. मात्र, आज शासनाने पुन्हा यात बदल करीत दाभाडे यांची बदली तात्पुरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहे. त्यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर औरंगाबाद अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना कार्यमुक्त अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र दाभाडे यांचा पोलीस अधीक्षक म्हणून मुक्काम पुढील आदेश येई पर्यंत वाढला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =