You are currently viewing वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार : आभा शुक्ला अपर मुख्य सचिव ( ऊर्जा )

वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार : आभा शुक्ला अपर मुख्य सचिव ( ऊर्जा )

वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार : आभा शुक्ला अपर मुख्य सचिव ( ऊर्जा )*

राज्याच्या अपर मुख्य सचिव ( ऊर्जा ) श्रीमती आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या कृती समिती 2024 च्या शिष्ट मंडळा सोबत आज मंगळवार दि.19 मार्च रोजी त्यांच्या मंत्रालयातील दालनात मीटिंग घेतली*

राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च ते 9 मार्च बेमुदत काम बंद आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर आज ही बैठक मंत्रालयात घेण्यात आली या मीटिंग मध्ये अनेक निर्णय घेण्यात आले

*1 ) हरियाणा राज्यातील कंत्राटदारमुक्त रोजगार करिता ऊपकंपनी बाबतीत अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल*

*2 ) भरती प्रकीया मध्ये कंत्राटी कामगारांना वयाची सवलत व 25 मार्क देण्यात येतील या करिता भरती प्रकीया थांबविण्यात येईल व फॉर्म भरण्यास मुदत वाढ देण्यात येईल*

*3 ) 8 वी पास आय टी आय व 10 वी पास आय टी आय च्या कामगारांना भरती प्रकीया मध्ये समाविष्ट करण्यात येईल*

*4 ) कामगारांची सेवा जेष्ठता यादी तयार करून या नुसार सर्व्हीस बेनिफिट देण्यात येईल*

*5 ) वयाच्या 60 व्या वर्षी पर्यंत शाश्वत रोजगार करिता आवश्यक त्या तरतूदी कल्याणकारी योजना राबविण्यात येईल*

*6 ) कामगारांना ऐस्क्रो बँक खात्याद्वारे थेट खात्यात वेतन दिले जाईल*

*7 ) कामगारांना मेडिक्लेम व अपघाती मृत्यू योजना नुसार लाभ देण्यात येईल*

*8 ) आंदोलना नंतर ज्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही त्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल*

*या मीटिंग मध्ये कृती समिती 2024 चे राज्य संघटक सचिन मेंगाळे, उमेश आनेराव नचिकेत मोरे, कमलेश राणे, राजन भानुशाली,कृष्णा भोयर उपस्थित होते.*

*तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकां सोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येईल त्या वेळी पगार वाढ व अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा असे आश्वासन देण्यात आले.9 मार्च च्या मिटिंगचा इतिवृत्तांता साठी ऊर्जामंत्रीयांच्या नागपूर कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल.*

 

सचिन मेंगाळे ( राज्य संघटक )*

मो: 9422037029
*महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 करिता.*

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =