You are currently viewing सावंतवाडीत १२ रोजी वैश्यवाणी समाजाचा ‘शतक महोत्सवी गौरव सोहळा ‘

सावंतवाडीत १२ रोजी वैश्यवाणी समाजाचा ‘शतक महोत्सवी गौरव सोहळा ‘

वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्गचे आयोजन

शनिवारी सायंकाळी सावंतवाडी शहरात भव्य शोभायात्रा

सावंतवाडी

वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू वर परिचय मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील वैश्य भवन हॉलमध्ये संपन्न होत आहे. यावेळी वैश्य समाज बांधव तथा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. यावेळी कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, कोकण रत्न उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वैश्यवाणी समाज मेळाव्याचा सकाळी ९.३० वाजता वैश्यवाणी समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या हस्ते ध्वजारोहण, ९.३० ते १०.३० वाजता अल्पोपहार व वधूवर नोंदणी, सकाळी १०.३० ते १.३० वाजता उद्घाटन व सत्कार, वधु वर परिचय ,दुपारी १.३० ते २.३० वाजता स्नेहभोजन, २.३० ते ५ वाजता वधू वर, पालक परिचय व गाठीभेटी, ६ वाजता समारोप होईल.
या सोहळ्याचे ध्वजारोहण वैश्य समाज कमिटी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग वैश्य समाज अध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे ,स्वागताध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराम धुरी, उपाध्यक्ष ॲड. पुष्पलता कोरगावकर, सेक्रेटरी शशिकांत नेवगी, खजिनदार गणेश बोर्डेकर, सदस्य दत्तप्रसाद मसुरकर, अशोक नाईक आदींनी केले आहे.
समाज बांधवांचे प्रबोधन होत असताना उद्योग व्यवसायाच्या नवा दिशांचे दर्शन व्हावे आणि त्यासोबत परस्पर परिचयातून कुटुंब व्यवस्था सशक्त होऊन समाज संघटना बळकट व्हावी म्हणून मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजाची शतक महोत्सवी सोहळ्याची शान वाढविण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शतक महोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त शनिवारी भव्य शोभायात्रा
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचा शतक महोत्सवी सोहळा सावंतवाडी येथे होणार आहे. या शतक महोत्सव वर्षाचे औचित्य साधून शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभा यात्रेत सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांचे डोळ्याचे पारणे फिटणारे ढोल पथक व नेरुर येथील चित्ररथाचा सहभाग असणार आहे. तरी यावेळी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 6 =