You are currently viewing देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

प्रांताधिकाऱ्यांकडे रक्कम प्राप्त ; खासदार विनायक राऊत यांची माहिती

धरणातील पाणी लिफ्ट करून आंगणेवाडीला नेणार

मालवण

देऊळवाडा आंगणेवाडी येथे प्रस्तावित धरण ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ करोड अनुदान रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले असून उर्वरीत रक्कम लवकरच प्राप्त होईल. धरण लवकर पूर्ण होईल. असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आंगणेवाडी येथे व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी,मंदार ओरसकर,अरुण लाड ,विजय पालव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले धारणाबाबत शेवटची नोटिफिकेशन दिलेली असून त्याची मुदत १ फेब्रुवारी पर्यत आहे. संपूर्ण जागेचे अनुदान ११ करोड निश्चित करण्यात आले आहे. पुढील प्रोसिजर पूर्ण होऊन वर्क ऑर्डर होईल. जगदंबेच्या कृपेने धरण लवकर पूर्ण होईल. धरणातील पाणी लिफ्ट करून आंगणेवाडीला कायमस्वरूपी देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प राबवला जाईल. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 9 =