You are currently viewing आरोंदा चेकपोस्ट युवक-युवतींसाठी खुले करा; निवेदनाद्वारे मागणी

आरोंदा चेकपोस्ट युवक-युवतींसाठी खुले करा; निवेदनाद्वारे मागणी

आरोंदा

गोवा राज्यात कामानिमित्त जाणाऱ्या आरोंदा गावातील तसेच परिसरातील युवक-युवतींना आरोंदा चेकपोस्ट खुले करावी अशी मागणी येथील युवक-युवती कामगारांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना काळात गोवा राज्य सीमेवर आरोंदा येथे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून चेकपोस्टवरून विना कोरोना तपासणी जाण्यास बंदी घातली होती.गोवा राज्यातही अशीच नियमावली जारी करण्यात आली होती.त्यात शिथिलता आली आहे.मात्र चेकपोस्टवरून गोव्यात जाण्यासाठी कोरोनाचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.मात्र या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे आहे.त्यामुळे या युवक युवतींसमोर रोजगाराचा प्रश्न पुन्हा उभा ठाकला आहे.

या पार्श्वभूमीवर आरोंदा चेकपोस्ट त्वरित खुला करण्यात यावा यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.आरोंदा सरपंच सौ.पार्सेकर,उपसरपंच सुभाष नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा केरकर, नरेश देऊलकर,सिद्धेश नाईक, अनंत नाईक, मयुर तानावडे, समिर मोरजे,बबन नाईक, सुदर्शन नाईक सहदेव साळगावकर रामचंद्र नाईक, समिर नाईक, अमित नाईक, तेजस तारी यांसह आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =